Share OPD

तुमचं रिकामं क्लिनिक केबिन, दुसऱ्या डॉक्टरच्या उपयोगाला

Share OPD वर क्लिनिक आणि डॉक्टर आपले न वापरलेले केबिन किंवा OPD चे तास लिस्ट करतात. ज्या डॉक्टरांना प्रॅक्टिससाठी जागा हवी आहे ते इथे शोधतात. पूरक स्पेशालिटी (उदा. बालरोग ↔ त्वचारोग, ऑर्थो ↔ फिजिओ, स्त्रीरोग ↔ बालरोग) एकत्र आल्या की दोघांचाही फायदा होतो.

जागा शोधा तुमची जागा लिस्ट करा

हे कसं चालतं

  1. shareopd.com/app.html वर तुमचा ईमेल टाका. आलेली लिंक उघडा किंवा कोड टाका. पासवर्ड लागत नाही.
  2. तुमचं नाव, स्पेशालिटी आणि मेडिकल कौन्सिल नोंदणी क्रमांक भरा. प्रमाणपत्र अपलोड करा. आमची टीम नोंदणी तपासते.
  3. जागा असेल तर: भाग, PIN, रिकामे दिवस-वेळ, भाडे आणि रिकाम्या खोलीचे फोटो टाका.
  4. जागा हवी असेल तर: स्पेशालिटी, भाग आणि दिवसानुसार शोधा आणि मोफत विनंती पाठवा.
  5. होस्ट 48 तासांत स्वीकारतो किंवा नाकारतो. दोघांनी होकार दिल्यावरच पत्ता आणि संपर्क शेअर होतो.

भाड्याचे नियम

फक्त ठरलेले मासिक भाडे, तासाचे भाडे किंवा प्रत्येक सेशनचे ठराविक शुल्क, दोन डॉक्टरांमध्ये थेट ठरवलेले. टक्केवारी, प्रति-रुग्ण, रेफरल किंवा कमिशन अशा व्यवस्थांना परवानगी नाही. Share OPD डॉक्टरांमधील भाडे गोळा करत नाही.

नेहमीचे प्रश्न

लिस्टिंगचा खर्च किती?

6 महिन्यांसाठी फी, GST सह. किंमत ॲपमध्ये पेमेंटच्या आधी दिसते. आम्ही लिस्टिंग तपासल्यानंतरच पैसे भरायचे असतात.

माझा पत्ता सर्वांना दिसेल का?

नाही. सार्वजनिक पानावर फक्त भाग आणि PIN दिसतो. पूर्ण पत्ता आणि नंबर दोघांनी होकार दिल्यावरच शेअर होतो.

USG मशीन असेल तर?

मशीन आणि जागेचं PCPNDT रजिस्ट्रेशन वैध असलं पाहिजे; आम्ही प्रमाणपत्राची प्रत घेतो. येणाऱ्या डॉक्टरचं नाव त्या रजिस्ट्रेशनमध्ये जोडल्याशिवाय स्कॅनिंग करता येत नाही.

कोणते फोटो टाकायचे?

फक्त रिकाम्या खोलीचे: केबिन, वेटिंग एरिया, प्रवेशद्वार. रुग्ण, चेहरे, फाइल्स किंवा स्क्रीन नको.

मदत कशी मिळेल?

WhatsApp वर मेसेज करा (फक्त मेसेज, कॉल नाही), सकाळी 9 ते रात्री 9.

कृपया Share OPD ला कधीही रुग्णांची माहिती पाठवू नका. इंग्रजीत पूर्ण माहिती: Help centre